
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढुन शाळकरी विद्यार्थ्यांचे केले स्वागत!
बैलगाडीतून मिरवणूक काढत त्या बैलगाडीचे केले पालकमंत्र्यांनी सारथ्य
(जि. प. शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी केले तोंड भरून कौतुक)
काल दिनांक १६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे या शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात काल तुंगत येते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी तुंगत येथील जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून घेऊन जात, सर्व नवीन विद्यार्थ्यांचे केले स्वागत तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पेनूर येथील तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या नक्षत्र लाॅन्सला ही भेट दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वामन नरसाळे, सरपंच डॉ अमृताताई रणदिवे यांच्याच मान्यवर पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की; शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येत आहे.. सर्व ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शाळेत शिकली पाहिजेत, या उदात्त हेतूने, महाराष्ट्र शासन रोज नवनवे उपक्रम व योजना राबवत असते.. त्यात सर्व ग्रामीण भागातील पालकांनी या सर्व मुलांना शाळेत पाठवावे व शासनाच्या विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
बैलगाडीचे सारथ्य करीत पालकमंत्र्यांनी केले नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत!
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्राच्या तुंगत येथील शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत बैलगाडी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मिरवणूक काढून करण्यात आले. हे स्वतः पालकमंत्र्यांनी या बैलगाडीचे सारथ्य केले. तसेच पालकमंत्री यांची भाषण सुरू असतानाच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, यांच्या भाषणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यापूर्वी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध शिक्षण उपक्रमाची माहिती,घेत, विद्यार्थी शिक्षक व पालकांचे कौतुक केले