
पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांनी दिली नक्षत्र लॉन्स येथे सदिच्छा भेट!
(तालुका अध्यक्ष रमेश माने मित्र परिवाराच्यावतीने पालकमंत्री गोरे यांचे करण्यात आले जल्लोषात स्वागत)
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालेले ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी आज पेनुर येथील भाजपा दक्षिण मंडळाचे अध्यक्ष रमेश माने यांच्या नक्षत्र लॉन्स येथे सदिच्छा भेट दिली.. यावेळी त्यांनी संपूर्ण नक्षत्र लॉन्सची पाहणी करून, रमेश माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान रमेश माने मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला
यावेळी त्यांच्या समवेत मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तथा भिमाचे संचालक सुनील दादा चव्हाण, श्री सागर (मास्तर) चवरे, तुंगतचे डॉ. आबासाहेब रणदिवे, श्री माऊली भाऊ हळणवर, श्री हर्षल कदम व संपूर्ण रमेश माने यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता