(मोहोळ तालुका भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी शकील भाई शेख यांची निवड!)
(विक्रांत उर्फ बाळराजे पाटील, यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली निवड!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या मोहोळ उत्तर विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शकील भाई मगन शेख यांची तसेच अल्पसंख्यांक मोर्चाच्या मोहोळ शहर अध्यक्षपदी नाजीम रफिक कुरेशी,व मोहोळ शहर अल्पसंख्यांक मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी गुलाम जाफर इराणी, यांची निवड सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण व मोहोळ तालुक्याचे माजी आमदार महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी करण्यात आल्या. वरील सर्व निवडीचे पत्र हे, लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्या शुभहस्ते सर्वांना प्रदान करण्यात आले. या निवडी प्रसंगी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुजीब भाई मुजावर, अनिसभाई कुरेशी, मोहोळ नगरपालिकेचे नगरसेवक तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती अझरुद्दीन कुरेशी, ताजोद्दीन कुरेशी .संतोष सोलनकर, त्याचबरोबर भाजपाचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडी प्रसंगी उपस्थित होते…

