जयंती गुरु शिष्याची; पंढरपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भीमशक्ती मंडळाकडून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपुरात महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभागाच्या नगरसेविका सौ.माधुरीताई दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
देशभरात महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंढरपुरात गुरु शिष्याच्या जयंतीनिमित्त मनसे आणि भीमशक्ती मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय विवाह सोहळा, होम मिनिस्टर, संविधान पुस्तकांचे वाटप आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते व नगरसेवक विनायक देवमारे अध्यक्षतेखाली आणि माजी नगरसेवक शिवाजी मस्के, समाजसेवक पृथ्वीराज भोसले, संतोष धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेवक लोकेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रतिमेचे पूजन व रॅलीचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते ज्ञानेश्वर ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेवक प्रसाद कळसे, समाजसेवक नानासाहेब कदम, माजी नगरसेवक धनंजय कोसाळकर, समाजसेवक सुमित शिंदे, अर्जुन माळवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता संविधान पुस्तकांचे वाटप नगरसेवक संजय बंदपट्टे यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेवक ओंकार जोशी, नगरसेवक राहुल शिंदे-नाईक, मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे, माजी नगरसेवक सुधाकर बंदपट्टे , प्रशांत शिंदे, समाजसेवक वैभव बडवे, प्रशांत मलपे, युवराज भोसले, शनि महाराज घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसे नेते दिलीप धोत्रे तर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अभिजीत पाटील, युवक नेते भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, गट नेते नगरसेवक नागेश भोसले, तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, संतोष सुळे, किरणराज घाडगे, आदित्य फत्तेपुरकर, सुधीर धोत्रे, दत्ता भोसले, बाबा चव्हाण, गणेश उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सौ. ज्योती संतोष सर्वगोड, सौ. विद्या अरुण सर्वगोड या उपस्थित राहणार असून नगरसेविका माधुरीताई धोत्रे, नगरसेविका प्रणिती घाडगे, नगरसेविका रुक्मिणी धोत्रे, नगरसेविका स्मिता फत्तेपुरकर, नगरसेविका साधना धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून मिरवणुकीची सुरुवात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून होणार असून या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, ज्येष्ठ नेते सुधीर भोसले, समाजसेवक बाबा चव्हाण, मनसे शहर उपाध्यक्ष गणेश उबाळे हे उपस्थित राहणार आहेत.

