करकंब शासकीय धान्य घोटाळा प्रकरणातील तत्कालीन तहसिलदांसह ०६ जण निर्दोष!
(तब्बल १७ वर्षांनी पंढरपूर न्यायालयात लागला हा निकाल)
(अँडवोकेट श्रीराम परिचारक, व अँडवोकेट चिंचोळकर, यांच्या युक्तीवादामुळे १७ वर्षानंतर खटला निकाली)
गाजलेल्या करकंब येथील शासकीय धान्य गोदामातील घोटाळा व अफरातफरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तत्कालीन तहसिलदार तथा सध्या सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत असलेले अजय पवार गोदाम पाल प्रभाकर रोकडे यांच्यासह सर्व सहा जणांची येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस ए साळुंखे यांनी निर्दोष मुक्तता केली.
करकंबचे तात्कालीन गोदामपाल प्रभाकर रोकडे तहसीलदार अजय पवार यांचे सह सहा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला होता सन २००९ ते २०१४ या कालावधीत तात्कालीन तहसीलदार पवार तसेच अन्य अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगन मताने करकम येथील शासकीय धान्य गोदामात विविध योजनांमधील लाभार्थींना वितरणासाठी असलेली २२० क्विंटल गहू ३११ क्विंटल तांदूळ १०९ रिकामा बारदाना यांचा अपहार केला संबंधित दप्तरात व्हाइटनर वापरून तसेच खाडाखोड करून धान्याचे तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला शिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी पंढरपूर गोदामातील धान्य परस्पर करकम गोदामात हलवली तात्कालीन अप्पर जिल्हाधिकारी मधुकर अर्दंड यांनी गोदामाला थेट भेट देऊन तपासणी केली तसेच लेखापरीक्षणानंतर हा धान्य घोटाळा समोर आला अशा आशयाची फिर्याद तात्कालीन जिल्हा पुरवठा विभागाचे सहाय्यक लेखा अधिकारी सुनील चव्हाण यांनी तालुका पोलीस ठाण्यात ३१ जानेवारी २००७ रोजी दाखल केली होती.
या खटल्याचा निकाल तब्बल 17 वर्षांनी पंढरपूर न्यायालयात लागला असून या खटलाची अंतिम सुनावणी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस ए साळुंखे यांच्यासमोर झाली सरकार पक्षातर्फे वीस साक्षीदार तपासण्यात आले मुख्य आरोपी अजय पवार व प्रभाकर रोकडे यांच्यातर्फे अनुक्रमे अँडवोकेट इंद्रजीत परिचारक, अँडवोकेट निखिल चिंचोळकर आणि अँडवोकेट विजयकुमार जाधव यांनी युक्तिवाद केला आरोपींनी विरुद्ध ठोस पुरावा पटलावर आलेला नाही तत्कालीन तहसीलदार पवार यांच्यावर राग असल्याने अप्पर जिल्हाधिकारी अर्दंड यांच्या आदेशाने हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा मुद्दा बचाव आरोपींच्या वकिलांनी घेतला. युक्तिवाद आणि सर्व बाबींचे अवलोकन करून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात अजय पवार यांच्या तर्फे अँडवोकेट इंद्रजीत परिचारक, अँडवोकेट निखिल चिंचोळकर तर प्रभाकर रोकडे यांच्यातर्फे अँडवोकेट विजयकुमार जाधव यांनी कामकाज पाहिले.