सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचे अकलूज चौक महूद येथे जंगी स्वागत!
(सकाळी ठीक ११ वाजता सांगोला विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: संचालक धनंजय काळे)
253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू राजाराम पाटील यांचे मुंबईहून ए .बी फार्मसह चिकमहुद येथे आज शुक्रवार दिनांक २५ऑक्टोबर रोजी सकाळी आगमन होणार आहे. त्यानिमित्त चिकमहुद येथे सकाळी ११ वाजता महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार व स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त सांगोला शहर व तालुक्यातील मान्यवर, पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी या सत्कार व स्वागत सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद येथे, सकाळी ११ वाजता आगमन होणार आहे .त्यानिमित्त सत्कार व स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे .तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.