*बेवारस स्थितीत पुन्हा एकदा चंद्रभागा नदी पत्रामध्ये दोन मृतदेह सापडले!*
*(मंदिर प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा पंढरपुरात उघड!)*
(बेवारस मृतदेहाची योग्य वेळी विल्हेवाट न लावल्यास नगरपालिकेसमोर आणून ठेवणार:- विक्रम शिरसट)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र पंढरी नगरीमध्ये सध्या पुरुषोत्तम मासानिमित्ताने दररोज एक लाखापेक्षा जास्त भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीय दर्शनासाठी येत असताना रोज नवनवीन प्रकारसमोर येत आहेत यामध्ये प्रामुख्याने चंद्रभागा नदीपात्रा मध्ये दररोज एक तरी बेवारस मृतदेह सापडत असून आजच चंद्रभागा नदीचे पात्रामध्ये, दोन बेवारस मृतदेह सापडल्यामुळे या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे. यांची माहिती समजताच भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत त्या बेवारस मृतदेहाबाबत पंढरपूर शहर पोलीस प्रशासनाला माहिती देऊन एक शववाहिका उपलब्ध करून देत एक मोठे सामाजिक काम केल्या असून याबाबत, आमच्या प्रतिनिधीशी त्यांनी, त्यांनी चर्चा केली असता, त्यांनी रोजच पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रामध्ये दररोज अशा प्रकारच्या घटना घडत असून याची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने व नगरपालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही तो मृतदेह पंढरपूर नगरपालिकेच्या दारामध्ये आणून ठेवून त्याचा तीव्र शब्दाचा मी निषेध करणार असल्याची यावेळी विक्रम शिरसट यांनी सांगितले..
या ठिकाणी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मनोज परमार व सर्वगोड मृतदेहाचे शवविच्छेदन होईपर्यंत वाट बघतात, सामाजिक काम करतात, असे मनोज परमार, व सर्वगोड, यांना मंदिर समितीच्या वतीने काहीतरी मानधन सुरू करावे अशी ही मागणी यावेळी विक्रम शिरसट यांनी केली..
दररोजचे असे प्रकार घडत असताना पंढरपूर नगरपालिका प्रशासन सुस्त झाले असून, त्यांनी या सर्व घटनांची दखल घ्यावी व अशा घटना कोणत्या पद्धतीने थांबवता येतील याबाबत काहीतरी त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी ही महत्वपूर्ण मागणी यावेळी विक्रम शिरसट यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
