दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.(महाविद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन,वृक्षारोपण,ग्रंथ अभिवाचन व पुस्तक भेट उपक्रम
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा येथे गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रंथालय आणि मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते स्व.दलित मित्र कदम गुरुजी तसेच मिसाइल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहण्यात आली.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये ग्रंथ प्रदर्शन,वृक्षारोपण आणि ग्रंथ अभिवाचन,पुस्तक भेट उपक्रम इत्यादी विविध उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात आले. याप्रसंगी प्रा पल्लवी भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावरती प्रकाशझोत टाकला.
विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून अवांतर वाचनाचा मार्ग स्वीकारावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी संस्था अध्यक्ष ॲड.सुजित कदम,संस्था उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम,सचिवा प्रियदर्शनी कदम, संस्थेच्या संचालिका तथा अकॅडमिक ऍडमिनिस्ट्रेटर डॉ.मीनाक्षी कदम,संचालिका तथा ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा तेजस्विनी कदम,संचालक यतीराज वाकळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी ग्रंथालय विभाग, मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग या विभागातील सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रा.डॉ.युन्नुस पठाण यांनी आकर्षक फलक लेखन करुन विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ.सचिन तोरडमल यांनी केले.सूत्रसंचालन सुहास कुलकर्णी यांनी केले.तर आभार डॉ. चैतन्य निकम यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
