डॉ. बी.पी. रोंगे यांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन इंडिया तर्फे जाहीर पाठिंबा!
(नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे (NPWA) अध्यक्ष, डॉ सचिन कोतवाल पाठिंबाचे पत्र केले जारी)
(पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक विशेष वृत्त)
नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NPWA), इंडिया यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतील ठराव क्रमांक १०, दि. १५ ऑक्टोबर २०२६ नुसार, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. बी.पी रोंगे सरांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संघटनेतर्फे अधिकृत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बी. पी. रोंगे हे एक उत्कृष्ट शिक्षक, अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अध्यापन क्षेत्रात केलेले कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न तसेच शिक्षकांच्या हितासाठी असलेली त्यांची बांधिलकी निश्चितच प्रशंसनीय आहे.
शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि शिक्षणव्यवस्थेच्या गुणवत्तापूर्ण विकासाला चालना देणे यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. डॉ. बी. पी. रोंगे यांचा अनुभव, शैक्षणिक योगदान आणि कार्याप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यकारिणीने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच सर्व शिक्षकांनी मतदान करताना अनुक्रमांक १७ पुढे पसंती क्रमांक १ देऊन डॉ. रोंगे यांना सहकार्य करण्याचे आवाहन नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.
