राजाभाऊ भिंगे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष, कृष्णराज महाडिक यांचा दौरा यशस्वी!
(भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक, यांच्या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपा युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!)
(जिल्हा परिषद सदस्य दुर्गाताई अंकुशराव यांच्या निवासस्थानी कृष्णराज महाडिक यांचा यथोचित सन्मान!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या सोलापूर जिल्ह्यातील ‘युवाशक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान त्यांनी पंढरपूर तालुक्याचे दौरा केला या दौऱ्याचे यशस्वी नियोजन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. राजाभाऊ भिंगे यांनी केल्यामुळे हा दौरा महत्वपूर्ण ठरला! या दौऱ्यामध्ये त्यांनी संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये सर्वच राजकीय नेते मंडळींचे लक्ष वेधून घेतले पंढरपूर शहरातील प्रत्येक पॉईंटवर त्यांनी भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे भले मोठे डिजीटल फ्लेक्स लावत, त्यांचे यशस्वीपणे या दौऱ्यामध्ये स्वागत केले..
राजाभाऊ भिंगे हे अनेक वर्षांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान असून कोल्हापूर येथील राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांचे ते कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये परिचित आहेत आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी आपले एक वेगळे बलस्थान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण केले असून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामाजिक प्रश्नांना आत्तापर्यंत पंढरपूर शहर व तालुक्यात वाचा फोडली आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक, यांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एक मोठे काम उभे केले असून, कृष्णराज महाडिक साहेबांच्या, स्वागत आहे हे प्रकर्षाने दिसून आले.
या दौऱ्याप्रसंगी पंढरपूर येथील गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. दुर्गाताई गोपाळ अंकुशराव यांच्या निवासस्थानी कृष्णराज महाडिक यांचा सन्मानही करण्यात आला..
यावेळी भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष, कृष्णराज महाडिक यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की; कोल्हापूर शहरामध्ये आम्ही ज्या पद्धतीने महिला वर्गासाठी जे स्वच्छता गृह उभे केले आहे त्याच धर्तीवर, पंढरपूर शहरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजिक, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नगरपालिका किंवा पालकमंत्र्याच्या माध्यमातून एक डिजिटल युक्त स्वच्छतागृह उभे करण्याला माझे पहिल्यांदा प्राधान्य असेल…
पंढरपूर ही दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते इथे दररोज लाखो लोक हे दर्शनासाठी येत असतात यावेळी त्यांना स्वच्छतागृह मिळत नाही. ही मोठी अडचण लक्षात घेऊन आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल युक्त स्वच्छता व उभे करण्याला प्राधान्य देऊ यासाठी… पालकमंत्री किंवा स्थानिक आमदार किंवा खासदाराच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ते काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही पार पाडू असे भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले….
यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील, अनेक सामाजिक संघटनांची पदाधिकारी, याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग तात्या ताठे, विठ्ठलचे माजी संचालक, राजाराम बाबर, पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक राहुल शिंदे, किसन बापू जाधव, पै. महादेव शेंडगे, पै. लिंगराज शेडगे, संचालक तात्या मामा नागटिळक,सागर दादा यादव, यशवंत बंडू चव्हाण, महेश दादा कांबळे, सौ. आरती ओंकार बसवंती, याचबरोबर पंढरपूर शहर व तालुक्यातील संपूर्ण खासदार धनंजय महाडिक व त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

