*पंढरपूरमध्ये आजपासून डिजिटल जनगणनेस सुरुवात*
*प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन :- मुख्याधिकारी महेश रोकडे*
पंढरपूरमध्ये आजपासून डिजिटल जनगणनेस सुरुवात प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन :- मुख्यअधिकारी महेश रोकडे
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पंढरपूर शहरात १ मे २०२६ पासून डिजिटल जनगणना मोहिमेस प्रारंभझालेला असुन प्रगणकांना आपली वैयक्तिक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
सदरील जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविली जात आहे. जनगणनेचा पहिला स्वगणेचा टप्पा पुर्ण झालेला असुन दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीतील दुसऱ्या टप्प्याच्या प्रत्यक्ष कामकाजास आजपासुन सुरुवात झालेली आहे. याकामी रमेश भोसले, सह संचालक, जनगणना संचालनालय कार्यालय, मुंबई यांनी प्रत्यक्ष भेट देवून बोहरी पेट्रोल पंप येथील भागातील सुरु असलेल्या कामाची माहिती घेतली व त्या भागाचे प्रगणक, पर्यवेक्षक यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील जनगणना अधिकारी, महेश रोकडे, मुख्याधिकारी हे उपस्थित असुन यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व प्रगणकांना मार्गदर्शन केले.
याकामी पंढरपूर शहरात जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज करण्याकरिता पंढरपूर शहरामध्ये २५ पर्यवेक्षक व १५० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली असुन याकामी प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. त्याअनुषंगाने श्री महेश रोकडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर यांनी जनगणनेच्या कामकाजाकरिता नियुक्त प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना वैयक्तिक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

