फडणवीसांचा शक्तीपीठ ड्रीम प्रोजेक्ट आगीतून फुफाट्यात!
जमावाने वीस लाखांचे मोजणी यंत्र दगडाने ठेचून फोडले!जन्मत प्रक्षुद्ध!
जुन्या आरेखनाला 100% बाधितांचा पाठिंबा!
जुन्या आरेखनावरच शक्तिपीठ चे स्वप्न शक्य!
खाजगी व सरकारी मोजणी अधिकारी धास्तावले!
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव परिसरात शक्तिपीठ महामार्गाचे डीमार्केशन च्या कामाच्या सुरूवीतीलाच शेतकऱ्यांनी मोनार्क या मोजणी कंत्राट घेतलेल्या खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत सुमारे वीस लाख रुपये किमतीचे सॅटॅलाइट मोजणी रोवर मशीन मोजणी यंत्र हिसकावून घेत दगडाने ठेचून फोडल्याचे वृत्त वणव्या सारखे पसरले आहे. त्यातच वाळवा तालुक्यामध्ये आक्रमक आंदोलकांनी मोजणी करणाऱ्या खाजगी कंपनीची जीप पाठलाग करुन पकडली व त्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना खाली उतरवून त्यांचा लॅपटॉप हिसकावून घेत सर्वांना जीप गाडीसह ग्रामपंचायत कार्यालयापुढे नेले. गर्दी पुढे जीवाची भीती वाटून संबंधित अधिकारी वर्गाने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र गर्दीचा दबाव लक्षात घेता त्यांनी शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करत असल्याचे कबूल केले. यावेळी संबंधित अधिकारी भीतीने अक्षरशः थरथर कापत होते. या वृत्ताबाबतच्या चर्चा आज सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल झाल्या. त्यामुळे शक्तिपीठ संबंधी अंमलबजावणी करणाऱ्या खाजगी व सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात आंदोलकां च्या आक्रमकते विषयी धास्ती बसली असून यापुढे सदर सर्वेचे काम पुढे नेण्याबाबत सर्व अधिकारी जीवाच्या भीतीने धास्तावलेले दिसत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांना नव्या अलाइनमेंट वर विरोध होणार नाही व पहिल्यापेक्षा ती अधिक चांगली आहे असे स्वतः मुख्यमंत्री सभागृहात बोलले होते. परंतु मुख्यमंत्री महोदयांचा शक्तिपीठ ड्रीम प्रोजेक्ट हा आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखा दिसत आहे. कारण जुन्या अलाइनमेंट पेक्षा नव्या अलाइनमेंट वर दहापट विरोधाचा जोर दिसत असून सर्व शेतकरी व नागरिक आम्ही प्रसंगी “जीवावर उदार होऊ पण जमीन देणार नाही” कारण सदर जमीन संपादित झाल्यानंतर आम्ही भूमिहीन होणार आहोत असे निक्षून सांगत आहेत. एकूण प्राप्त परिस्थिती चे अवलोकन करता जुन्या अलाइनमेंट वर शेतकरी व नागरिकांचा विरोध संपलेला असून येथील हजारो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या ड्रीम प्रोजेक्ट ला लेखी सहमती सादर करून ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे. नव्या अलाइनमेंट पेक्षा जुन्या अलाइनमेंट वरूनच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकर पूर्ण होऊन महामार्गाचे स्वप्न साकार होऊ शकते असे सर्रास चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर परिक्षेत्रात शेतकऱ्यांची दरडोई जमीन धारणा जास्त असताना सुद्धा विरोधाची ही परिस्थिती असेल तर अत्यल्प जमीनधारणा असलेल्या वाळवा, इस्लामपूर, वारणानगर,करवीर या भागात विरोधाची तीव्रता किती प्रचंड असू शकेल याची कल्पना येते. जुन्या अलाइनमेंट वरचे बाधित शेतकरी व नागरिक आमचे मुख्यमंत्री साहेबांच्या प्रकल्पाला समर्थन आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्याच्या प्रयत्नात असून गेली तीन महिने त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकलेली नाही. तथापि त्यांनी त्यांचे लेखी समर्थनाचे तीनशे पानाचे निवेदन एम एस आर डी सी चे सीईओ श्री.अनिल गायकवाड यांच्याकडे सादर केले आहे. जुन्या अलाइनमेंट वरून महामार्ग व्हावा या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भिडे गुरुजी, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील,आमदार आबिटकर, आमदार सुरेश साळुंखे, आमदार राजेश खरे,माजी आमदार यशवंत माने, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आपले लेखी समर्थन पत्रे दिली असल्याचे समजते व माननीय मुख्यमंत्री व जुन्या अलाइनमेंट वर महामार्गास जमीन देण्यास तयार असलेले सर्व शेतकरी यांचा संवाद घडवून देण्याच्या प्रयत्नात असून अजून अशी बैठक अजून झालेली दिसत नाही. तथापि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या अलाइनमेंट वरून महामार्ग नेण्यासंदर्भात एखादी बैठक होणे गरजेचे दिसत आहे म्हणजे प्रत्यक्ष बाधित शेतकरी नागरिक व सरकार यांच्यामधील गैरसमज संपू शकतील अशी चर्चा सर्व लोकप्रतिनिधींमध्ये व शेतकरी नागरिक यांच्यामध्ये होताना दिसत आहे.

