*उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय!*
*(पालकमंत्री यांच्या निर्णयामुळे , शेतकऱ्यांमधून आनंदोत्सव साजरा)*
*(आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी व पालकमंत्री गोरे यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री जयकुमार (भाऊ) गोरे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीपिकांना पाण्याची निर्माण झालेली तीव्र गरज लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अक्कलकोटचे आमदार माननीय श्री सचिन दादा कल्याणशेट्टी मा. आमदार मा. राजनजी पाटील साहेब, अजिंक्यराणा पाटील , भाजपा मंडल अध्यक्ष , पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव यांच्या मागणीनुसार उद्या बुधवार, दि. १५ जुलै पासून डावा व उजवा कालवा तसेच सीना–माढा बोगद्यातून सीना नदीमध्ये शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून उभी पिके वाचविण्यास मदत होणार आहे.शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री श्री जयकुमार (भाऊ) गोरे साहेब यांचे आभार मोहोळ दक्षिणचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी मानले!
