*विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे दोन्ही युनिटचे बाॅयलर पूजन संपन्न!*
*(विठ्ठलराव शिंदे कारखाना उत्तमरीतीने शेतकऱ्यांसाठी काम करत आहे:-गिरीराज अग्निहोत्री)*
*(विठ्ठल कारखान्यावर, या व्यक्तीने डबल टिबल कर्ज करून ठेवले आहे:- जि.प सदस्य आदिनाथ देशमुख)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर येथील सन २०२६-२७ चार २६ वा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ गुरुवारी एनसीडीसी पुणे चे विभागीय संचालक गिरिराज अग्नीहोत्री यांचे शुभहस्ते व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.तसेच युनिट नं.२ करकंब येथील ८ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ स.शि.वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते व भोसे चे सरपंच गणेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच विठ्ठल कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन मोहनआण्णा कोळेकर व जि.प.सदस्य आदिनाथ देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यासाठी काम करीत असून सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे.कारखाना सुस्थितीत असून चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार सुरू आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे विभागीय संचालक गिरीराज अग्नीहोत्री यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले
पुढे बोलताना गिरीराज अग्निहोत्री म्हणाले की,राष्ट्रीय विकास निगमचे ही संस्था १९६३ पासून कायदा मंत्रालयाच्या अधीन चांगले काम करणाऱ्या सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने,डेअरी आदींना राष्ट्रीय विकास निगम कडून कमी व्याज दराने अर्थपुरवठा करण्यात येतो. येणारा हंगाम कमी दिवसाचा असून कारखान्याने साखर व इथेनॉल चे जास्तीत जास्त उत्पादन करावे असे सांगितले.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी केले.ते म्हणाले की,राष्ट्रीय विकास निगमने कारखान्याच्या विकासासाठी शासनाची हमी न घेता कारखान्याचा कारभार पाहून सातत्याने मदत केली आहे.त्यांचा सहयोग चांगला आहे.आगामी हंगाम पाऊस न पडल्याने अत्यंत अडचणीतून जात आहे.कारखान्याने दर दहा दिवसाला पेमेंट केले आहे.राज्यातील हा एकमेव कारखाना होय.सभासदानी इतरत्र ऊस न देता वेळेत पेमेंट देणाऱ्या विठ्ठलराव शिंदे कारखान्यास ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले.
समारंभाचे सुरूवातीस युनिट १ कडे संचालक राजेंद्र खोत व त्यांच्या पत्नी शारदाताई खोत यांच्या हस्ते व युनिट २ कडे संचालक जितेंद्र गायकवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई गायकवाड यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट गायकवाड यांच्या हस्ते विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आभार संचालक सचिन देशमुख यांनी मानले.सुरेश पाठक यांनी पौरोहित्य केले. सूत्रसंचालन रविंद्र जाधव यांनी केले.
यावेळी कारखान्याचे पोपट गायकवाड-व्हाईस चेअरमन, संचालक रणजित शिंदे,विक्रमसिंह शिंदे,रमेश येवले-पाटील,पोपट चव्हाण, अशोक मिस्कीन,अमोल चव्हाण,राजेश खोत,विलास कौलगे, सचिन देशमुख, संजय लोकरे,जितेंद्र गायकवाड,लाला मोरे,पंडीतराव पाटील,कैलास तोडकरी,राजाराम नाळे, राजाराम थोरात,श्रीकांत पाटील, पांडुरंग घाडगे , प्रदीप चौगुले तज्ञ संचालक-
श्री.सिध्देश्वर घुगे-लऊळ, श्री.प्रताप घाडगे-वरवडे,श्री.ब्रम्हदेव मस्के-शेवरे,श्री.संतोष चंदनकर-आलेगांब बु, श्री.सागर हुंबे-बेंबळे, श्री.संजय पवार-बेंबळे, बंडूनाना ढवळे, आदी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट गायकवाड यांच्या हस्ते विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. आभार संचालक सचिन देशमुख यांनी मानले. सुरेश पाठक यांनी पौरोहित्य केले, सूत्रसंचालन रवींद्र जाधव यांनी केले. यावेळी तुकाराम बंडगर, योगेश बोंबडे, रमेश येळाले-पाटील, नागनाथ वाघे, वेताळ जाधव, राजाभाऊ थोरात, पांडुरंग घाडगे, अशोक मिस्कीन, दीपक पाटील, संभाजी पाटील, श्रद्धेय मस्के, दिलीप भोसले, नागनाथ पाटील, नागेश खटके, लाला मोरे, परमेश्वर खरात, सचिन होदाडे आदी उपस्थित होते.
सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
*यावर्षी गाळप हंगामाची परिस्थिती खूप कठीण असून पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी वाढ झाली नाही त्यामुळे आमच्यासाठी खूप कठीण काळ असून, एवढा ऊस येईल तो वेळेवर गाळप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार असून सर्व शेतकऱ्यांचा विशेष:ता पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आणण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे*
*रणजीतभैय्या शिंदे*
*चेअरमन सोलापूर जिल्हा दूध संघ!*
