दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी दिलेला शब्द पाळला!
(प्रकाश वाघ घर ते धनाजी वाघ वस्तीवरील मुरमीकरणाचे काम दिलेल्या शब्दाप्रमाणे करून दिले पूर्ण)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मा. आमदार राजन (मालक) पाटील, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, मा. आमदार रामभाऊ सातपुते, मा. यशवंत तात्या माने व जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा मोहोळ दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी प्रकाश वाघ व धनाजी वाघ वस्तीवरील रस्त्याचे मुरमीकरणाचे काम पूर्ण करून दिले.
यावेळी रस्त्याची पाहणी करताना मोहोळ दक्षिण भाजपा तालुकाध्यक्ष पेनुरचे माजी सरपंच रमेश माने, युवा नेते रणजीत चवरे, माजी सरपंच देविदास चवरे, प्राचार्य देविदास रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल माने, उद्योजक भैरवनाथ चवरे, बाळू आप्पा चवरे, उद्योजक मुन्ना राऊत, शीतल चवरे, तानाजी सावंत, प्रकाश वाघ, रामभाऊ डोके, अजित वाघमोडे, प्रा. गणेश क्षीरसागर, भागवत जावळे, चिंटू चवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
