*जि. प.सदस्य चरणराज चवरे यांच्या पुढाकारातून पेनूर गटातील ग्रामीण शेतकऱ्याच्या परिसरातील रस्त्याला नवी दिशा!*
*तारापूर रोड ते अर्जुन गवळी वस्ती–टेकळे वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ; शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती!*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते सोलापूर चरणराज चवरे यांच्या निधीतून तारापूर रोड ते अर्जुन गवळी वस्ती तसेच टेकळे वस्ती या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाचे उद्घाटन अशोक भाऊ ,गवळी गुरुजी, कुंडलिक टेकळे, दत्तात्रय टेकळे, औदुंबर टेकळे व कैलास टेकळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ दळणवळणाचे साधन नसून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. वाड्या-वस्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडणारे रस्ते सुस्थितीत असल्यास शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होते. ही गरज ओळखून चरणराज चवरे यांनी निधी उपलब्ध करून या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाला चालना दिली आहे.
काम करणारा माणूस तोच, जो जनतेच्या गरजा ओळखून त्या प्रत्यक्ष कृतीत आणतो. केवळ आश्वासन देणे नव्हे, तर दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे, निधी उपलब्ध करून घेणे आणि काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत प्रयत्न करणे हीच विकासाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे. या भूमिकेतून वाड्या-वस्त्यांवरील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न चरणराज चवरे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे यावेळी उपस्थितांकडून सांगण्यात आले.
रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कामाच्या शुभारंभाचे शेतकरी बांधवांनी स्वागत केले.यावेळी परिसरातील नागरिक, शेतकरी बांधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
