*पंचायत समितीत कथित भ्रष्टाचाराची विभागीय स्तरावर चौकशी करण्यात यावी:- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील*
*(आंदोलनस्थळी उमेश पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
मोहोळ पंचायत समितीच्या प्रशासकीय काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची विभागीय स्तरावर सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच १५ वा वित्त आयोगाच्या निधी वाटपाबाबत जलद गतीने चौकशी करून मंजूर निधीच्या वाटपास स्थगिती देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य बाळासाहेब गायकवाड, धनाजी माळी, डॉ. अमित व्यवहारे आणि गणेश मुळे हे पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
आज या आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या सदस्यांची सविस्तर भेट घेतली. त्यांच्या मागण्या, संबंधित विषयातील कागदपत्रे तसेच पंचायत समितीच्या प्रशासकीय काळातील कामकाजाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि सदर प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात यावी, संबंधित बाबींची तपासणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी केली.
तसेच १५ वा वित्त आयोगाच्या निधी वाटपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजूर निधीच्या वाटपाबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
सार्वजनिक निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो. त्यामुळे त्या निधीचा वापर पारदर्शक, नियमानुसार आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव न देता होणे आवश्यक आहे. पंचायत समितीच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सक्षम प्राधिकरणामार्फत निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
उपोषणकर्त्या सदस्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी आणि आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मी करू बघा असं सातत्याने सुरू ठेवु.
