*भारतीय जनता पार्टीच्या.युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी लिंगराज शेंडगे यांची एकमताने निवड!*
*(युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली इथुन पुढे सोलापूर जिल्हा काम करणार:- लिंगराज शेंडगे)*
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सोलापूर पूर्व जिल्हा, उपाध्यक्षपदी लिंगराज शेंडगे यांची फेरनिवड करण्यात आली. संसदरत्न, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड केली. यावेळी तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी, युवकांना संघटित करून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी लिंगराज शेंडगे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगितले!
