रयत क्रांती संघटनेच्या वतीने मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन सादर!
(दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, मोहोळ तालुक्यात पूर्णपणे दुष्काळ जाहीर करावा:- जिल्हा कार्याध्यक्ष श्री प्रसन्न जाधव)
(शासनाने गंभीर दखल न घेतल्यास, रयत क्रांती संघटनेच्या वतीने, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल:-प्रसन्न जाधव)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याबरोबरच मोहोळ तालुक्यातील आज रोजी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पशुधन व चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, या, पशुधनाला व शेतीला वाचवण्यासाठी शासनाने, सर्व परिस्थितीची पाहणी करून पूर्णपणे मोहोळ तालुका हा पूर्णपणे, दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा त्याचबरोबर! शेती पिकाला व पशुधन वाचवण्यासाठी, सर्व शेतकऱ्यांना भरघोसपणे मदत करावी या व इतर अनेक मागण्यांसाठी आज मोहोळ येथे रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष, प्रसन्न जाधव यांनी मोहोळ चे तहसीलदार, सचिन मुळीक, यांना एक रीतसर निवेदन सादर केले असून, त्यांनी या निवेदनामध्ये अनेक मागण्या केलेल्या आहेत!
आज मोहोळ येथे तहसीलदार मा. सचिन मुळीक साहेब यांची भेट घेऊन मोहोळ तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी बांधवांच्या अडचणी, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शंकर पाटील रणजीत जाधव व ओंकार जाधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष कायम सुरूच राहील! हि सर्व परिस्थिती, लक्षात घेऊन यावर तातडीने सकारात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने किंवा स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री प्रसन्न जाधव यांनी केली आहे!
