– *भीमा साखर कारखान्यात ४७ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न.*
– *(भीमा साखर कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित; गाळपासाठी सर्व यंत्रणा सज्ज).*
– *(५ लाख टन गाळपाच्या उद्दिष्टाने भीमा सज्ज; बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदर येथे सन २०२६-२७ गळीत हंगामाच्या शुभारंभाची नांदी ठरणारा ४७ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कारखान्याचे मार्गदर्शक व राज्यसभा खासदार मा. श्री. धनंजय भीमराव महाडिक तसेच संस्थेचे चेअरमन मा. श्री. विश्वराज धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला आहे. कारखान्यातील गाळपासाठीची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, यंदा ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. पैलवान भीमराव दादा महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कारखान्याचे संचालक मा. श्री. तात्यासो ज्ञानोबा नागटिळक व मा. सौ. सुजाता तात्यासो नागटिळक यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. तसेच संचालिका मा. सौ. सिंधू चंद्रसेन जाधव व मा. श्री. चंद्रसेन मुरलीधर जाधव यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.
यंदा दुष्काळाच्या चटक्यामुळे ऊस उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने गळीत हंगाम लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कारखान्यातील सर्व यंत्रणा, तांत्रिक विभाग तसेच आवश्यक पूर्वतयारीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उपलब्ध ऊसाचे नियोजनबद्ध गाळप करून हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
