*राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्तीबद्दल उमेश दादा पाटील यांच्या नियुक्तीबद्दल सत्कार*
*(मोहोळ तालुक्याध्यक्ष आण्णासाहेब पाटील, यांनी दिल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी उमेश दादा पाटील यांना शुभेच्छा)*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय श्री. उमेशजी पाटील यांचा मोहोळ येथील सावली निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शरद गोरे, दाजी मासाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उमेशजी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा केला!
