*मोहोळ दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी केला नरेंद्र पाटील यांचा येतो यथोचित सन्मान!*
*(मराठा समाजाचे तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना उद्योजक बनवण्यासाठी महामंडळ चांगले काम करत आहे:तालुकाध्यक्ष रमेश माने)*
महाराष्ट्र राज्याचे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष मा. नरेंद्र जी पाटील साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर विश्रामगृह येथे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या समवेत मोहोळ दक्षिण मंडल अध्यक्ष रमेश माने यांनी भेट घेऊन स्वागत केले..मराठा समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना उद्योजक बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. मा. नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महामंडळाच्या योजना तळागाळातील तरुण , तरुणी पर्यंत पोहचून होतकरू रोजगार निर्मिती आणि उद्योजक तयार झाले आहेत यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस विकास वाघमारे , नरखेड जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष बालाजी वाघमारे, युवा नेते सुदर्शन यादव , अतुल पवार,विशाल चौधरी, यशवंत नामदे उपस्थित होते.
