*आमदार राजू भाऊ खरे यांनी दिलेल्या शब्द अखेर पाळला!*
*(देगाव(वाळुज) मोहोळ येथील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत दोन लाख पंधरा हजाराची आर्थिक मदत जाहीर!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मौजे देगाव (वाळूज) येथील श्री नागनाथ महाराज मंदिराच्या रंगकामासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज मंदिर ट्रस्टकडे आर्थिक मदत सुपूर्द केली.
काही महिन्यांपूर्वी मोहोळ विधानसभा मतदार संघातील देगाव (वा.) येथील श्री नागनाथ महाराज मंदिराच्या रंगकामासंदर्भात ग्रामस्थांनी माझी भेट घेतली होती. त्यावेळी मंदिराचे रंगकाम करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. गोपाळपूर येथे देगाव (वा.) येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान मी मंदिराच्या रंगकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार विजयादशमीच्या कालावधीत मंदिराचे रंगकाम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी रंगाकरिता ₹१ लाख २५ हजार आणि मजुरीसाठी ₹९० हजार, असा एकूण ₹२ लाख १५ हजार खर्च झाला.
मंदिराचे संपूर्ण रंगकाम ₹२ लाख १५ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाल्याने, मी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत प्रत्यक्ष झालेल्या खर्चानुसार ₹२ लाख १५ हजारांची आर्थिक मदत श्री नागनाथ महाराज मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केली.
श्री नागनाथ महाराज मंदिर हे देगाव (वा.) आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशा धार्मिक व सामाजिक श्रद्धास्थानांच्या जतनासाठी आणि विकासासाठी आपल्याकडून शक्य ते सहकार्य व्हावे, ही माझी कायम भूमिका राहिली आहे.
ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करता आला आणि श्री नागनाथ महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करता आली, याचे मनापासून समाधान आहे.
श्री नागनाथ महाराजांचा आशीर्वाद देगाव (वा.) येथील सर्व ग्रामस्थ व भाविकांवर सदैव राहो, हीच चरणी प्रार्थना!
यावेळीश्री महादेव आतकरे ,प्रमोद आतकरे , प्रताप आतकरे काकासाहेब आतकरे ,विजय दगडे ,सोमनाथ आतकरे सुहास आतकरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
