सोलापूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट!
(नागेश काका भोसले यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून)
(आदित्य फत्तेपूरकर यांची नागेश काका भोसले यांच्यावर सडकून टीका)
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आदित्य फत्तेपुरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी सूचक म्हणून सही केली होती. आज छाननीच्या दरम्यान नागेश भोसले यांनी माजी बनावट सही केली असल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले. त्यामुळे आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
अर्जाच्या छाननी दरम्यान नाट्यमय घडामोडी घडत आहे. पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मी आदित्य फत्तेपूरकर यांना सूचक म्हणून सही केली नाही. माझ्या दोन्ही सह्या बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एक वाजता सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये आपल्या प्रतिज्ञा पत्रावर नागेश भोसले ठाम राहिले. त्यामुळे आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होणार असल्याची शक्यता आहे.
यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली.
या कारस्थानामध्ये भाजप असल्याचा आरोप यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला. नागेश भोसले यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला. नागेश भोसले यांच्यावर दबाव टाकून त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करायला लावले असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते नागेश भोसले यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयातच नागेश भोसले यांच्या विरोधात नागेश भोसले गद्दार है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आम्ही सामने आले होते.
तर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपला दोष देण्यापेक्षा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आपल्याला सूचकची म्हणून बनावट सही करावी लागत असल्याचा आरोप केला.
