*मा.प्रशांत मालकांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा!*
सोमवारपर्यंत वाट बघू नाहीतर चंद्रभागा नदी पत्रामध्ये आम्ही स्वतः स्वइच्छेने आत्मदहन करू:- सतीश लेंगरे
स्व. मोठ्या मालकांनी व प्रशांत मालकांनी पंढरपूर तालुक्याचे नंदनवन केले:-भुषण शिवाजी माने
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा विधान परिषदेची निवडणूक लागल्यापासून रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत.. कधी माजी आमदार रामभाऊ सातपुते तर मा.आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तर कधी राजश्रीताई नागणे, यांचे नाव सोशल मीडियातून चर्चेला येत असतानाच पंढरपूरचे पांडुरंग परिवारचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक, यांचे नाव समोर येत आले असून, अनेक घडामोडीनंतर व अर्ज भरला शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे… काही कार्यकर्त्यांनी, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना रक्ताने पत्र लिहून आपल्या भावना प्रकट केल्या… पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील कार्यकर्त्यांनी तर मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दुग्धभिषेक घालून उमेदवारीसाठी मागणी केली..
चक्क आज तरी पंढरपूर तालुक्यातील, गोपाळपूर येथील कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जात निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा जवळजवळ दिला! यासाठी त्यांनी पंढरपूर येथील अहिल्या पुलावरून नदीपात्रामध्ये, प्रयत्न केला.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून, वेळी दखल घेतली नसती तर आज फार मोठा काहीतरी अनर्थ पंढरपूर तालुक्यात घडला असता, असे चित्र संपूर्णपणे निर्माण झाल्या असून या पांडुरंग परिवारातील युवा कार्यकर्त्यांनी भाजप पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींना सोमवार पर्यंत जा वेळ दिला असून जर, माननीय प्रशांत मालकांना उमेदवारी जाहीर न झाल्यास, आम्ही चंद्रभागा नदीच्या पत्रामध्ये उद्या टाकून स्वतःचे प्राण देऊ असा गंभीर इशारा यावे या तरुण कार्यकर्त्यांनी दिला आहे…
यावेळी युवा समर्थक सामाजिक कार्यकर्ते सतिशभाऊ लेंगरे, भूषण शिवाजी माने, बबलू महाराज आजबे, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

