*(जिल्हाधिकाऱ्यांनी पहिला मुक्काम भैरववाडी – मनगोळीत करावा)*;
*(शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या जोत्स्नाताई पाटील यांची मागणी!)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘सुराज्य ग्राम मुक्काम’ अभियानांतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी महिन्यातील चार दिवस गावात मुक्कामी राहणार आहेत. गावागाड्यातील अडचणी थेट जाणून घेऊन त्या सोडवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
गावात मुक्काम करून अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असून, या अभियानाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर या अभियानाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून एका आदर्श पद्धतीने व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.
नरखेड गट हा कायम दुर्लक्षित राहिला असून भैरववाडी-मंगोळी परिसरातील नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते, पाणी, वीज आणि इतर शासकीय योजनांपासून हा भाग वंचित आहे.
त्यामुळे जर जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः या गावात मुक्काम केला, तर येथील खऱ्या समस्या शासन दरबारी पोहोचतील आणि त्यावर तातडीने उपाय निघेल, असे मत जोत्स्नाताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी गावात मुक्काम केल्यास प्रशासन आणि जनता यांच्यात थेट संवाद निर्माण होईल आणि ‘सुराज्य’ हे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
*चौकट*
*भैरववाडी – मनगोळी*
*पासून सुरुवात करा*
या अभियानात जिल्हाधिकारी साहेबांनी पहिला मुक्काम नरखेड गटातील भैरववाडी-मंगोळी या गावात करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना (शिंदे गट)च्या नेत्या जोत्स्नाताई पाटील यांनी केली आहे.
*ठळक वाक्य*
*“सुराज्य ग्राम मुक्काम अभियानातून खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग मोकळा होईल.” – जोत्स्नाताई पाटील*
