सोलापूर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 23275/- किमतीचा साठा जप्त
*(सोलापूर शहरातील ३ पान शॉप्सवर धडक कारवाई करत पुन्हा एकदा दाखवून दिली आपल्या कामाची चुणूक)*
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला बंदी असलेले गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आणि मावा यांची बेकायदेशीर विक्री व साठवणूक करणाऱ्या सोलापूर शहरातील तीन प्रमुख पान दुकानांवर अन्न व औषध प्रशासच्या (FDA) अधिकाऱ्यांनी रेड केली असून या कारवाईमध्ये पान टपरी सील करण्यात आल्या आहेत.
सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाने गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट २०२६ या पान टपऱ्यांवर धाडी टाकून धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी २३,२७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिन्ही पान टपऱ्या सील करण्यात आल्याआहेत.
या दुकानांवर झाली कारवाई-
१. मे. ओंकार पान शॉप (मालक: विजय सिध्दनाथ चव्हाण) – आरटीओ कार्यालय जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर.
२. मे. अलकुंटे पान शॉप मालक: विश्वनाथ सुभाष अलकुंटे – मुरारजी पेठ, लकी चौक, सोलापूर.
३. मे. दत्त पान शॉप मालक: उल्हास शिवाजी मोरे– अजिंक्य हॉटेलसमोर, लकी चौक, सोलापूर.
वरील पान टपऱ्यांवरप्रतिबंधित गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू व प्रतिबंधित अन्नपदार्थांची पुन्हा विक्री होऊ नये म्हणून प्रशासनाने तिन्ही पान टपऱ्या तात्काळ सील केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित टपरी चालक दुकानदार व्यक्तींविरुद्ध सोलापूर शहरातील विजापूर नाका आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या कलम ५९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उत्कर्षा एखंडे, नंदिनी हिरेमठ, रेणुका पाटील व रामानंद स्वामी यांच्या पथकाने केली आहे.
*प्रशासनाचा कडक इशारा*
*सोलापूर शहरात गोपनीय माहितीच्या आधारे अशा कारवाया यापुढेही सुरूच राहतील. पान टपरीधारकांनी किंवा कोणत्याही अन्न व्यावसायिकांनी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अन्नपदार्थांची विक्री करू नये. असा प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.*”
*साहेबराव. ए. देसाई (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर)*
