अँड रणवीर राजेंद्र राऊत यांनी घेतली मनसे नेते दिली बापू धोत्रे यांची सदिच्छा भेट!
(आम्ही सर्वजण राजाभाऊंच्या पाठीमागेच आहोत; तुम्ही निश्चिंत रहा बापूंनी दिले ठोस आश्वासन)
(दिलीप बापूंच्या आश्वासनानंतर पंढरपुरात राजाभाऊ राऊत यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता)
सोलापूर विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रणवीर राजेंद्र राऊत यांनी मनसे नेते मा. श्री. दिलीप बापू धोत्रे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी रणवीर भैय्या यांनी दिलीप बापू धोत्रे यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली व तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.
भेटीदरम्यान दिलीप बापूंनी राजेंद्र राऊत यांच्यासोबतच्या अनेक वर्षांच्या मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.आम्ही सर्वजण आमचे जिवलग मित्र राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दिलीप बापू धोत्रे यांनी यावेळी रणवीर भैय्या यांना दिला.
