मा आमदार यशवंत तात्या माने यांचे प्रयत्न झाले यशस्वी
(कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे स्वयंचलित बॅरेजमध्ये रूपांतर होणार:-मा आमदार यशवंत तात्या माने)
(१८ लाख रुपयांची तरतुदी या बंधाऱ्यासाठी आमदार माने यांनी केली जवळजवळ मंजूर!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरील पुळूज येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे स्वयंचलित बॅरेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी माजी आ. यशवंत माने यांनी शासन दरबारी लावून धरली होती. या मागणीसाठी केलेल्या प्रयत्नांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी १९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासकीय पत्रानुसार पुळूज बॅरेजच्या सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी १८ लाख रुपयांची तरतूदही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कामाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
भीमा नदीवरील या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर झाल्यास पाण्याचा अधिक साठा आणि नियोजन शक्य होणार असून त्याचा शेतीच्या सिंचनासाठी फायदा होऊ शकतो. विशेषतः पाणी उपलब्धतेचा प्रश्न भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचे माजी आमदार यशवंत माने यांनी सांगितले. यामुळे पुळूजच्या या कामाकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
