*जैनवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
(छोट्याशा गावातून ९ डॉक्टर घडल्याचा अभिमान – ॲड. दीपक पवार!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिपकदादा पवार मित्रमंडळ व ग्रामपंचायत जैनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ जैनवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे व विक्रीकर सहाय्यक आयुक्त मनोज जमदाडे उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या गावातील २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते हार,फेटा, शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार म्हणाले की, “आपण गेल्या दहा वर्षांपासून अशा प्रकारच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन गावातील इतर मुलांनीसुद्धा असेच यश संपादन करावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यातील बहुतांश मुलांचा पाया मराठी शाळेतूनच मजबूत झाला असून त्यांच्या यशामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडते. विशेष म्हणजे, आमच्या छोट्याशा गावातून तब्बल ९ विद्यार्थी डॉक्टर बनले आहेत, तर अजून १२ विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठीचे शिक्षण घेत आहेत.”
*सत्कारमूर्ती गुणवंत विद्यार्थी :*
वैद्यकीय क्षेत्र: शितल बंडू लिंगडे (BAMS), शिवानी शहाजी गोफणे (BAMS), माधुरी हरी खरात (BAMS), स्वप्नाली सत्यवान गोफणे (BHMS), माधवी मारुती लोखंडे (BHMS), ऋषीकेश संजय गोफणे (BHMS), स्वाती बंडू गोफणे (MD साठी निवड), अजित बाहुबली खाणे (MD साठी निवड), प्रसाद तुकाराम मोरे (MBBS).
फार्मसी व कृषी क्षेत्र: धनश्री प्रशांत साळवे (M.Pharm), मयुरी सतीश साळवे (B.Pharm), वैभवी सुधीर साळवे (B.Pharm), मयुरी हरी खरात (B.Pharm), सृष्टी अमर गोफणे (B.Pharm), शुभम दत्तू नारनवर (B.Pharm), विशाल नवनाथ गोफणे (B.Sc हॉर्टी).
शिक्षण, बँकिंग व आयटी क्षेत्र: वर्षा विष्णू गोफणे-येडगे (जि. प. पालघर सहशिक्षिका), सुनिता विष्णू गोफणे-अर्जुन (जि. प. पुणे सहशिक्षिका), रुपाली राजू चव्हाण (IDBI Bank), विश्वजीत अनिल नांद्रे (TCS),विवेक बंडू पवार (TCS), वैष्णवी भिमराव खरात (Computer Engineer).
या कार्यक्रमासाठी सरपंच शोभा गोफणे, कल्पना माने, माजी पंचायत समिती सदस्या मधुरा पवार, डॉ. अमोल बागल, विलास गोफणे, डॉ. बाहुबली खाणे, कल्पना शिंगटे, महादेव लिंगडे, प्रा. गणेश जमदाडे, नागनाथ खरात, दत्तात्रय गोफणे, दादा दानोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पवार, सिताराम लिंगे, गणपत दासरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजकुमार जमदाडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मल्हारी गोफणे यांनी मानले.
