*खासदार धनंजय महाडिक यांना दीपावली पाडव्याच्या निमित्ताने यशवंत उर्फ बंडू चव्हाण यांनी दिली सदिच्छा भेट!
(आपुलकी व प्रेमाची भेट म्हणून दिला उभयंतांचा फोटो चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने खासदार साहेबांना सप्रेम भेट!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे किंग मेकर राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांना दीपावली व दिपावलीच्या इतर पवित्र पर्वानिमित्त सुस्ते येथील प्रगतशील बागायतदार पंढरपूर तालुक्याचे खंदे समर्थक यशवंत बंडू चव्हाण यांनी कल्पक अशी पांडुरंगाची सदिच्छा भेट भीमा कारखान्याच्या कार्यस्थळावर आल्यानंतर दिली असून, या भेटीप्रसंगी खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज भैय्या महाडिक व यशवंत बंडू चव्हाण व आर्यन चव्हाण यांच्यामध्ये सर्व राजकीय विषयांवर सखोल चर्चा झाली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय विषयांवर यशवंत बंडू चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली! याचबरोबर त्यांनी त्यांच्या सामाजिक सर्व कामाचे, तोंडभरून कौतुक केले! पंढरपूर मंगळवेढा व मोहोळ तालुक्याच्या अनेक राजकीय विषयांवर त्यांची सविस्तर चर्चा झाली! या भेटी प्रसंगी टाकळी सिकंदरचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार शिवाजीराव गुंड पाटील, तानाजी भाऊ गुंड पाटील, यशवंत बंडू चव्हाण आर्यन चव्हाण, संचालक सुनील रावसाहेब चव्हाण, संचालक तात्यामामा नागटिळक,मा. सरपंच भारत पाटील, भीमा कारखान्याचे प्रवक्ते पांडुरंग श्रीधर ताठे, लिंगादेव शेंडगे, राजाराम बाबर,अजून इतर अनेक पुळुज आसपासच्या गावातील, खासदार धनंजय महाडिक व भीमा परिवारावर प्रेम करणारे असंख्य सर्व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!
