*सभासद, कामगारांच्या एकजुटीतून भीमाचा हंगाम यशस्वी करणार – चेअरमन विश्वराज महाडिक.*
*(शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत भीमाची हंगामाची दमदार वाटचाल.)*
*(साखर पोती पूजनाने भीमाच्या हंगामातील गोड यशाची सुरुवात.)*
*(शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणण्यास भीमा कटिबद्ध – खासदार धनंजय महाडिक)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथे चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये उत्पादित झालेल्या साखर पोत्यांच्या पूजनाचा कार्यक्रम बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी कारखाना कार्यस्थळावर राज्यसभा खासदार तथा मार्गदर्शक संचालक श्री. धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री. विश्वराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी चेअरमन विश्वराज महाडिक यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कारखान्याचे सभासद शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूक कामगार तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हंगामाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांचे अभिनंदन करत आगामी काळातही सर्वांनी एकजुटीने, समन्वयाने व जबाबदारीने काम करून चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद शेतकरी, कामगार आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून सर्वांच्या सहकार्याने कारखान्याची वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू ठेवण्याचा विश्वासही चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस लवकरात लवकर गाळपासाठी कारखान्याकडे आणण्याच्या दृष्टीने शेती विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या. सभासद शेतकऱ्यांचे हित नेहमीच केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास कारखाना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कामगार व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
*“सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा ऊस शेतात वाया जाऊ नये, यासाठी शेती विभागाने विशेष दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर गाळपासाठी आणण्याचे नियोजन करावे. सभासद शेतकऱ्यांचे हित नेहमीच केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास कारखाना नेहमीच प्राधान्य देत आहे. शेतकरी, कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चालू गळीत हंगाम यशस्वी केलाजाईल.”*
खा. धनंजय महाडिक राज्यसभा खासदार
