बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने कुर्डूवाडी विभागीय कार्यालयाच्या समोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू:-सुनिल ओहोळ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असून याला कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले, उपविभागीय कृषी अधिकारी यांना बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने 1/2 /2021 रोजी या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले होते, त्यानुसार उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून 4/9/2020 च्या आदेशानुसार शेततळ्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने कोणत्याही भ्रष्ट अधिकार्‍यावर कारवाई झाली नसून ती कारवाई तात्काळ करण्यात यावी यासाठी दि.23/5/2022 धरणे आंदोलन करण्यात आले तात्काळ कारवाई न झाल्यास पुणे विभागीय कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे उपाध्यक्ष सचिन वाघमारे, जिल्हा सचिव पोपट लोखंडे, युवक तालुका उपाध्यक्ष खंडू वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत वाघमारे, लखन वाघमारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here