फॅबटेक कॉलेजच्या बी फार्मसी  विद्यार्थ्यांची सर्ज फार्मास्युटिकल प्रा. लि. या कंपनीस भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील  बी फार्मसी   विद्यार्थ्यांची सर्ज फार्मास्युटिकल प्रा. लि. जेजुरी-पुणे   या कंपनीस   भेट   देण्यात आली. यावेळी जनरल  मॅनेजर श्री.व्ही एस  सिन्हा यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्रा. सुरज कांबळे यांनी केला.

         यावेळी  जनरल  मॅनेजर श्री.व्ही एस  सिन्हा  यांनी   विद्यार्थ्यांना सर्ज फार्मास्युटिकल  तसेच कंपनीच्या वेगवेगळ्या विभागास भेट देऊन कच्चा माल, उत्पादन,गुणवत्ता,पॅकेजिंग बद्दलची  सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना  दिली. बी फार्मसीचे एकूण ४४  विद्यार्थी उपस्थीत होते. विद्यार्थ्यांच्या  अनेक प्रश्नांची उत्तरे जनरल  मॅनेजर श्री.व्ही एस  सिन्हा व त्यांचे सहकारी श्री.नारायण तिवारी  यांनी  देऊन त्यांच्या शंका दूर केल्या. हि इंडस्ट्रियल भेट  विद्यार्थ्यांना  कपंनीचे कामकाज  प्रत्येक्षात कसे चालते याकरिता घेण्यात आली होती.

          संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, संस्थेचे  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  हि इंडस्ट्रियल भेट  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या पूर्व परवानगीने व प्रा, सुरज कांबळे व प्राध्यापिका प्रज्ञा गडहिरे  यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे  पार पडली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here