मोहोळ सोलापूर महामार्गावर शिरापूर येथील शेतकऱ्याचा दुर्देवी अंत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(अपघाताला कोण जबाबदार आहे त्याच्या वरती त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

शिरपूरचे प्रगतशील बागायतदार मोहन दत्तात्रय आदमाने हे मोटारसायकलवरून मोहोळ कडून लांबोटीकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलला आरटीओ अधिकाऱ्यांच्या गाडीने ओव्हरटेक करत पुढे गेले. पुढे असणाऱ्या कंटेनरला गाडी आडवी लावल्यामुळे त्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे आदमाने हे त्या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी दोन ते अडिचच्या सुमारास घडली आहे. वडवळ- कोळेगाव दरम्यान घडली आहे. उपस्थित नागरिकांनी आरटीओ कार्यालयाच्या वाहनांची मोडतोड केली आहे .या अपघाताला तेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी भूमिका सध्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये घेतली असल्याचे समजत आहे.
दररोजच्या आशा वाढत जाणाऱ्या अपघातामुळे महामार्गावरील, प्रवास करायचा का नाही असा प्रश्न महामार्ग शेजारील अनेक गावातील शेतकरी कुटुंबातून विचारला जात आहे त्याचबरोबर या सर्व गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना आपल्या दैनंदिन कामासाठी मोहोळ पंढरपूर अथवा सोलापूर या ठिकाणी जावे लागते बाहेरगावावरून लांब पल्ल्याच्या गाड्या येतात त्या गाड्या अति भरधाव वेगाने सुसाट पुढे निघून जातात. आणि राज्य महामार्ग असल्यामुळे पुढे या गाड्या कुठे जातात आणि सोलापूरच्या पुढे गेल्या काही अंतरावर कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या बॉर्डर असल्यामुळे या गाड्या पुढे गेल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागत नाही.
बऱ्याच अपघाताची तर सरकार दप्तरी नोंद सुद्धा होत नसल्याचे यावेळी अनेक तेथील उपस्थित नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी बोलून दाखवले. यामुळे या महामार्गावरती “स्पीड ब्रेकर” वाढवावेत अशी मागणी वाढू लागली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here