श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 गळीत हंगामास सुरूवात! याही वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यास एफ.आर.पी.पेक्षा जास्त दर देऊ :चेअरमन प्रशांतराव परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 गळीत हंगामास सुरूवात!

याही वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यास एफ.आर.पी.पेक्षा जास्त दर देऊ :चेअरमन प्रशांतराव परिचारक

श्री पांडुरंगच्या गळीत हंगामाची उत्साहात सुरुवात श्रीपूर ता. माळाशीरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन . २०२३ / २४ गळीत हंगामाची उत्साहात सुरुवात झाली .

प्रथम युटोपिअन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन (मालक) परिचारक व पांडुरंगचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सालविठठ्ल यांचे हस्ते गव्हाणीचे पुजन करण्यात आले .प्रथम कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले .

यावेळी माहीती देताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी गतवर्षीच्या ऊसाला सर्वाधिक २७५१ रु . दर दिला हा एफ.आर.पी.पेक्षा जास्त असून यावर्षी कारखान्याने मिल , बॉयलर विभागात आवश्यकत्या दुरुस्ती केल्याने यंदा साडे आठ हजार मे.टनाने गाळप करण्यात येणार असून उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप केले जाणार आहे .

याप्रसंगी चेअरमन प्रशांतराव (मालक) परिचारक , युटोपिअन शुगरचे अध्यक्ष उमेशराव (मालक) परिचारक ,पांडुरंगचे उपाध्यक्ष कैलास खुळे सर, जेष्ठ संचालक दिनकर(भाऊ) मोरे , दिलिपराव चव्हाण , वसंतराव(नाना) देशमुख, दाजी(काका) पाटील , ज्ञानदेव ढोबळे , तानाजी वाघमोडे , बाळासाहेब यलमार , भगवान चौगुले , लक्षण (तात्या) धनवडे , भास्कर कसगावडे , भैरु वाघमारे , गंगाराम विभूते , हणमंत कदम , दिलिप गुरव , सुदाम मोरे , किसन सरवदे , विजय जाधव , शामराव साळुंखे , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here