फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये राज्यस्तरीय ”टेक्नोफॅब २ के २२’ स्पर्धा उत्साहात संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कल्पनांना वाव देण्यासाठी फॅबटेक महाविद्यालयामध्ये टेक्नोफॅब २ के २२ या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन सांगोला पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री.अनंत कुलकर्णी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  संस्थेचे चेअरमन  मा.श्री.भाऊसाहेब रुपनर,  मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर,कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे आदी उपस्थित होते.
       या वेळी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पी आय  अनंत कुलकर्णी  यांनी  विद्यार्थ्यांना आपला वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, नेहमी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, नेहमी नम्र असले पाहिजे, मोठी स्वप्न  बघा, मोठे व्हायचे असेल तर मार्ग सापडतात. तसेच आपण रोजगार देणारे बनले पाहिजे  असे  त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
   संस्थेचे चेअरमन  मा.श्री.भाऊसाहेब रुपनर यांनी फॅबटेक उद्योग समूहाविषयीची माहिती थोडक्यात दिली व कोणतेही काम आपल्या क्षेत्रात जीव ओतून केले तर यश हे हमखास मिळत असते असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेज नेहमीच २ के २२ सारखे कार्यक्रम राबवित राहील असे सांगितले.
          सदर या कार्यक्रमास राज्यातील सुमारे २६  महावियालयातून १५७० हुन अधिक   विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मेकॅनिकल विभागातून ४३५, संगणक विभागातून ३१०, इलेक्ट्रिकल विभागातून २०८, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून १८० व सिव्हिल  विभागातून ३०१  विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सर्व विभागाच्या मिळून २१  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेमध्ये ७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेचा आनंद लुटला. व या महाविद्यालयामधून घेतलेल्या अत्याधुनिक  तांत्रिक  शिक्षणाचा आधार घेत स्वतःमध्ये असलेल्या संशोधन वृत्तीला प्रात्यक्षिकाद्वारे मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले.
         या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे कल्पना विकास, व्यक्तिमत्व, संभाषण कौशल्य, संघटन कौशल्य, बौद्धिक विकास व आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे यांनी सांगितले. स्पर्धेच्या परीक्षकांनी फॅबटेक महाविद्यालयाद्वारे  विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयी -सुविधाबद्दल व सर्व कार्यक्रम वेळेत सुरु करून वेळेत पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन  मा. भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, यांनी सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  या वेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,  पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल अवताडे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थी  यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप प्रा.प्रियांका पावसकर  यांनी  केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here