पंढरपुरात आ.समाधानदादा आवताडे यांच्या फंडातील 10 लाख रूपयांच्या विकासकामांचा शुभारंभ शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या पाठपुराव्यास यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांच्या आमदार फंडातून छोटा व बडा कब्रस्थान येथे 10 लाख रूपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी, पंढरपूर शहराध्यक्ष आदम बागवान, अकबर हाजी शेख ट्रस्ट कब्रस्थान कमिटीचे अध्यक्ष शफी मुलाणी, मुबारक आतार, नासीर मुजावर, जहीर तांबोळी, मुबारक पठाण, सामाजिक परिवर्तन विचार मंच इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुदर्शन मसुरे, फैयाज सय्यद, वसीम शेख, जमीर सय्यद, अरबाज बोहरी , आमीन शेख यांच्यासह सर्व नागरिक व मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांपासून सतत पाठपुरावा करून ऊर्दू शाळेमध्ये कॉंक्रीटीकरण, वृक्षारोपण, बडा व छोटा कब्रस्थान येथे प्रत्येकी 1 हायमास्ट दिवे व सध्या 10 लाख रूपये निधीतून दोन्ही कब्रस्थानमध्ये दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 2 रूम बांधण्यात येत आहेत. त्याचबरोबर अल्पसंख्यांक बहुल विकास योजनेअंतर्गत 10 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांनी जमीर तांबोळी यांनी करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्यांना आशिर्वाद दिले.
यावेळी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी म्हणाले की,  वक्फ बोर्ड महाराष्ट्र राज्यचे चेअरमन व सीईओ डॉ.वजाहत मिर्झा साहेब (औरंगाबाद) यांना पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजातील धार्मिक स्थळांतील अडीअडचणी व समस्यांबाबत निवेदन दिले होते ते लवकरच पंढरपूर दौऱ्यावर येणार असून समाजबांधवांशी चर्चा करून समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here