*शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी संवेदनशीलता अन् तातडीची कृती!*
*(रणजीत भैय्या शिंदे यांनी पोषणकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधुन आस्थेने केली चर्चा!)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
उपळाई बुद्रुक येथील शेतकरी सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सर्व पाझर तलाव व बंधारे भरून देण्यात यावेत, या मागणीसाठी अन्नत्याग उपोषणास बसले होते.
या ठिकाणी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा भाजपा नेते मा. श्री.रणजितसिंह (भैय्यासाहेब) बबनराव शिंदे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी आस्थेने चर्चा केली. शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन त्यांनी सीना-माढा योजनेचे कार्यकारी अभियंता पवार साहेब व कनिष्ठ अभियंता लोंढे साहेब यांच्याशी तातडीने संपर्क साधून टेल एन्डच्या गावांना पाणी देण्याच्या सूचना केल्या.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाच्या क्षणी त्यांच्या सोबत उभे राहणे आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणे, हीच खरी बांधिलकी!
