*सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या ₹२३४कोटींच्या मंजुरीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना जलसंपदा मंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने पूर्णविराम!*
*तुळशी ग्रामस्थांचे जलसंपदा मंत्री व विद्यमान आमदार यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सिना-माढा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी प्रस्तावित ₹234 कोटींच्या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांच्या भूमिकेवर जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याशी झालेल्या तुळशी येथील दूरध्वनीवरील संभाषणातून स्पष्टता आली आहे.
योजनेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाबाबत शासनस्तरावर झालेली कार्यवाही, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया तसेच निधीच्या मंजुरीसंदर्भातील वस्तुस्थिती मंत्री विखे पाटील यांनी दूरध्वनीवरील संभाषणातून स्पष्ट केली.
सिना-माढा उपसा सिंचन योजना गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेतील जुन्या यंत्रसामग्री व पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती – नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावाला शासनस्तरावर मिळालेली मंजुरी ही आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून माढा मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेला बळकटी देणारी महत्त्वाची बाब आहे.
आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली असून, याबाबत कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी जलसंपदा मंत्र्यांचे स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा योजनेचे काम प्रत्यक्षात मार्गी लावणे आणि माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून देणे, हाच आमदार अभिजीत आबा पाटील यांचा प्रमुख उद्देश आहे.
