*कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार प्रदान!*
*(कारखान्याचे चेअरमन मा. प्रशांत परिचारक व्हा, चेअरमन कैलास खुळे,सर, कार्य,संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांनी स्विकारला नवी दिल्ली येथे पुरस्कार)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उच्च साखर उतारा विभागातील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासो पाटील, पंजाबचे कृषिमंत्री गुरमीतसिंह तसेच हरियाणाचे व छत्तीसगडचे सहकारमंत्री यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार कारखान्याचे चेअरमन मा. आ. प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकरराव मोरे, तानाजी वाघमोडे, लक्ष्मण धनवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, प्रोडक्शन मॅनेजर एम. आर. कुलकर्णी, चीफ अकाउंटंट रविंद्र काकडे यांनी स्वीकारला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा. आ. प्रशांतराव परिचारक यांनी सर्व सभासद, संचालक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, अधिकारी व कामगार यांचे अभिनंदन केले. कारखान्यास पुरस्कार मिळण्याची परंपरा अखंडित असून प्रत्येक वर्षी कारखान्यास नवनवीन पुरस्कार मिळत आहेत. कारखाना प्रत्येक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ काम करीत असून कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवलेला आहे. कारखाना असेच आगामी काळातही वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, साखर उद्योगामध्ये नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्याकडून विविध विभागांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्कारासाठी निवड समिती असते. कारखान्याच्या प्रत्येक विभागातील कामकाजाचा आढावा घेऊन सर्वोच्च कार्य असणाऱ्या संस्थेस पुरस्कार दिला जातो.
त्याचप्रमाणे कारखान्याच्या साखर व उत्पादन विभागामध्ये आधुनिकीकरण केले असून गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर, गाळप होणाऱ्या साखरेचे प्रमाण नगण्य, मिल कार्यक्षमतेत वाढ, सिझनमध्ये तांत्रिक बाबींमुळे कारखाना बंद राहण्याचे प्रमाण खूपच कमी, साखरेचा दर्जा चांगला ठेवण्यासह सर्वच कामांमध्ये कारखान्याने उल्लेखनीय काम केले आहे.
ऊस तोडणीनंतर गाळप होईपर्यंत लागणारा कालावधी अत्यंत कमी करून ताज्या उसाचे गाळप करण्यावर भर दिलेला आहे. याचबरोबर कारखान्याच्या रॉ मटेरियल व उत्पादनाचा विचार करून कारखान्यास देशपातळीवरील हा पुरस्कार मिळाला असून, पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
