*रयत क्रांती पक्ष व संघटनेच्या वतीने कुरुल येथे भव्य अशी ऊस व इथेनॉल परिषद संपन्न!*
*(७, हजार रुपये प्रति टनाला दर दिल्याशिवाय कुणाचाही उसाला कोयता लावू देणार नाही:- सदाभाऊ खोत)*
*(मोहोळ तालुक्यातील साखर कारखानदारांनी अनेक गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे:-आमदार गोपीचंद पडळकर)*
*(शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, मांडण्यात यावा प्रा:- संग्राम दादा चव्हाण)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
यापुढे साखरेचे दर किलो ५५ रुपयांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन ७ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय शेतात उसाला कोयता लागू देणार नाही, असा सडेतोड इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
कुरुल (ता. मोहोळ) येथे रयत क्रांती पक्ष व संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्न जगताप यांच्या वतीने आयोजित ‘ऊस व इथेनॉल परिषदेत’ सदाभाऊ खोत बोलत होते. या परिषदेस आमदार गोपीचंद पडळकर, ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य प्रा. सुहास पाटील आणि कार्याध्यक्ष दीपक भोसले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
काटा मारणे आणि रिकव्हरी चोरी थांबली पाहिजे : भोसले
परिषदेत बोलताना कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी साखर कारखानदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, कारखाने वजन काट्यात मारतात आणि रिकव्हरीची चोरी करतात. भ्रष्ट साखरसम्राटांना भाजपमध्ये आश्रय मिळाला आहे. हे गैरप्रकार आता थांबले पाहिजेत. साखरेचे दर वाढण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करू! यावेळी प्राध्यापक संग्राम दादा चव्हाण यांनी ऊस दरवाढ इथेनॉल मिश्रण त्याचबरोबर वाढलेले खताचे भाव शेती कामासाठी न मिळणारे मजूर, शेतीसाठी लागणाऱ्या, सर्व साहित्यांची ३ वर्षांमध्ये झालेली भरमसाठ वाढ, त्याचबरोबर शेती पिकांना न मिळणारा हमीभाव यावर आपल्या भाषणामध्ये सडेतोडपणे, भाष्य केले असून त्यांनी यावेळी शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात यावा अशी मागणी या कुरुल येथे झालेल्या ऊस व इथेनॉल परिषदेवेळी सर्वांसमोर केली!
यावेळी उसाला पहिली उचल ५ हजार रुपये मिळालीच पाहिजे, अन्यथा एकही ऊस तोड दिला जाणार नाही. तसेच, गेल्या वर्षी रयत क्रांती संघटनेच्या लढ्यामुळे शेतकऱ्यांना २८ कोटी रुपये अतिरिक्त मिळाल्याचा दावा भोसले यांनी यावेळी केला.
दारू-गुटख्याचे भाव वाढले; साखरेच्या दरावरच ओढ का?
महागाईच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी टीका केली की, सोयाबीनचे दर वाढल्यावर कुठेही चर्चा होत नाही, मात्र साखरेचे दर वाढताच रोज ओरड केली जाते. दारू आणि गुटख्याचे भाव वाढल्यानंतर गप्पचूप खरेदी करणारे लोक साखरेचे भाव वाढल्यावर मात्र गरिबांचा खोटा कळवळा आणतात. औद्योगिक वापरासाठी साखरेचे दर वाढलेच पाहिजेत. साखरेचे दर रोखण्यामागे काही कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांचे षड्यंत्र आहे.
विधानसभेत लढा उभारणार
सदाभाऊ खोत म्हणाले, उसाला योग्य भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मागे हटू नये, तुम्ही गावपातळीवर लढा उभा करा, आम्ही विधानसभेत लढा देऊ. असे. प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले..
या ऊस व इथेनॉल परिषदेसाठी, कुरुल गावातील , प्रा. सुहास पाटील रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष,प्रसन्न जाधव प्रा. माऊली जाधव, प्रमोद जाधव, प्रताप पाटील, किरण दादा जाधव, प्रकाश बाबा जाधव, राहुल जाधव, चेअरमन प्रसाद जाधव, महेश वाघमारे, रुपेश पाटील, बालाजी पाटील, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, लहू वाघमोडे, उमेश घोडके, नारायण जगताप, अप्पा जाधव, नामदेव पवार, हनुमंत गिरी, अमोल वेदपाठक, शरद गोरे हनुमंत कोळी, प्रशांत पाटील सोन्याबापु जाधव, अमोल जाधव, दयानंद जाधव, दादा जाधव,अक्षय जाधव अभिजीत जाधव, आदि मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते!
