*मुख्यमंत्री लवकरच आमदार बबनदादा शिंदे यांच्या भेटीला माढ्यात येणार:-पालकमंत्री जयकुमार गोरे*
*(भाजपा व देवा भाऊ हे संपूर्णपणे शिंदे परिवाराच्या पूर्णपणे पाठीशी आहेत:-पालकमंत्री जयकुमार गोरे)*
*(३०२५, नंतर १०० दिवाळीसाठी शेतकऱ्यांना देत बबनदादा शिंदे यांनी दिवाळीसाठी देत शेतकऱ्यांना दिला दिलासा)*
सोलापूर जिल्ह्या प्रतिनिधी
मतदारसंघातील अडचणी सोडवून सर्व विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पालकमंत्री या नात्याने शिंदे घराण्यातील बबनदादा ,संजय मामा आणि रंणजीत भैया यांचे पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, त्यामुळे यांच्या कोणत्याही मागणीस सदैव तत्पर असणार व या मतदार संघाच्या विकास कामासाठी कोणतीही अडचणी येऊ देणार नाही असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
माढाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या 75 व्या मृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये नामदार गोरे बोलत होते अध्यक्षस्थानी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर होते .
नामदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले की हृदय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिये नंतर आज बबन दादा मायदेशी आले आहेत, हे अतिशय शुभ लक्षण असून आपणा सर्वांना त्यांचे आशीर्वाद आहेत, परंतु आजारी असताना देखील दादांनी मला रस्ते पाणी मतदारसंघातील अपुरी कामे याबद्दल विचारणा केलेली आहे. स्वभाव, आपुलकी ,सन्मान व विकास हे धोरण बबनदादा शिंदे यांचे मध्ये असल्यामुळे मागील तीस वर्षात माढा मतदारसंघांमध्ये धवल क्रांती हरित क्रांती कृषी औद्योगिक क्रांती सारखे विकास कामांचे जाळे उभा राहिले, यामुळे असा नेता दुसरा कोणीही असणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो. रणजीत शिंदे यांनी मतदारसंघातील केलेल्या मागण्याविषयी नामदार गोरे म्हणाले की मोडनिंब एमआयडीसीचा फॉरेस्ट च्या एनओसी चा प्रश्न सुटला आहे, सीनामाढासाठी 300 कोटी रुपये सुप्रमा मंजूर होईल, माढा तालुक्यातील रस्त्यासाठी 100 कोटी रुपये दिले जातील, श्रीपूर येथे एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, माढा शहराला एक ते दीड महिन्याच्या आत पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन मंजूर केली जाईल ,तसेच सध्या उजनी 100 टक्के भरलेले असले तरी जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चारा वैरणीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विषयी देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे. अधिक बोलताना गोरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, 48 हजार कोटीचे वीज बिल माफ केले, कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजनेसाठी 54 हजार कोटी रुपये दिले, तसेच पंढरपूर अक्कलकोट अरण व भवानी मंदिर यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी शिंदे कुटुंबाच्या मागे कायम उभे आहोत म्हणून जनतेने यापुढे मत देताना विचार करून मतदान करावे व ज्याला आपण मतदान करतो तो आपल्या पाठीशी राहील का याचा विचार करावा.
..
*(मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बबनदादांच्या भेटीसाठी येणार….)*
नामदार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या दोन महिन्याच्या आत बबनदादांच्या भेटीसाठी याच ठिकाणी येणार आहेत आणि त्यावेळेस या ठिकाणच्या काही विकास कामांचे उद्घाटन व गळीत हंगाम शुभारंभ मोळीपूजन देखील होणार आहे.
स्वागत पर भाषणात रणजीत शिंदे यांनी बबन दादांच्या शस्त्रक्रिये विषयी मागील पंधरा महिन्यातील माहिती सांगून डॉक्टर तसेच शनि सहकार्य दिले त्या सर्वांचे आभार मानले . तसेच माढा मतदारसंघातील रस्ते वीज सीनामाढा योजनेसाठी निधी ,मोडनिंब एमआयडीसी माढा शहर पाणीपुरवठा खैराव मानेगाव योजना, पावसा अभावी उद्भवलेली परिस्थिती याविषयी पालकमंत्र्यांना माहिती देऊन या अडचणी सोडवण्या विषयी मागणी केली.
अध्यक्ष पदावरून बोलताना रणजीत सिंह नाइक निंबाळकर म्हणाले की बबन दादा सध्या मृत्यूला हरवून परत आले आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा . यापुढे मतदारसंघात बबन दादा रणजीत भैय्या , संजय मामा यांचे पाठीशी आम्ही विकास कामासाठी सदैव उभे राहणार. सध्या कृष्णा फ्लड डायवर्षण चे काम थोडे राहिले आहे या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यातून 51 टीएमसी पाणी उजनी धरण्यात येणार आहे व यासाठी 120 किलोमीटरचा बोगदा पूर्ण होत आला आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस या ठिकाणी येऊन त्याचे उद्घाटन करणार आहेत त्यावेळेस मी आणि नामदार गोरे देखील उपस्थित आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
दिवाळीसाठी शेतकऱ्यांना शंभर रुपये ऊस बिल हप्ता ….बबनदादा शिंदे
याप्रसंगी बबनदादांनी देखील आपले विचार व्यक्त करून सर्वांचे आशीर्वाद प्रेम व ईश्वराची कृपा असल्यामुळे आपण गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून यशस्वी पार पडलो याबद्दल त्यांनी डॉक्टर सर्व कुटुंबीय आणि सहकार्यांचे विशेष आभार मानले। याप्रसंगी बबनदादांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे 100 रुपयाचा दिवाळीसाठी ऊस बिल हप्ता जाहीर केला, त्यामुळे आता एकूण 3125 रुपये प्रति टन शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या उसाचे बिल मिळणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी राजन पाटील दशरथ माने दिलीप सोपल यांनीही समायोजित विचार व्यक्त करून बबन दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच ह भ प बोधले महाराज शिवानंद सरस्वती व गगनगिरी बालगिरी महाराज यांनीही दादांना आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमास आमदार राजेंद्र राऊत आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार अरुण लाड तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य माजी आमदार संग्राम दादा थोपटे संजय मामा शिंदे दिलीप माने, प्रशांत परिचारक दिपक आबा साळुंखे, राम सातपुते, तसेच कल्याणराव काळे इंद्रजीत पवार चेतन सिंह केदार भगीरथ भालके पंडित काका देशमुख रश्मी बागल राहुल पूर्वत आदिनाथ देशमुख राहुल रेडे प्रकाश पाटील दिलीप माने माजी आमदार दत्तात्रय सावंत संग्राम दादा थोपटे यांचे सह प्रतापराव पाटील पृथ्वीराज सावंत सुभाष गुळवे अमृता वाघे माजी आमदार विनायकराव पाटील दीपक आबा साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बबनदादांची धान्य ,ग्रंथ ,वस्त्र ,फळे पेढे अशा तुला करण्यात आल्या. तत्पूर्वी दुपारी साडेबारा वाजता बबन दादाचे रांजणी येथे आगमन झाले त्या ठिकाणावरून आडेगाव शिराळ टेंभुर्णी व कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील जेसीबी वरून आणि हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करून केलेले स्वागत बबनदादांनी स्वीकारले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन तोडकरी यांनी केले.
