*खासदार. धनंजय महाडीक यांच्या भाषणादरम्यान ओघात झालेल्या चुकीचा काँग्रेसकडून ओंगळवाणा विपर्यास ही चिंतेची बाब!*
*प्रा. संग्राम दादा चव्हाण*.
(कार्यकर्त्यांची राजकीय जडणघडण प्रगल्भ परिपूर्ण सुजाण आणि स्वाभिमानाची असावी!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर येथील दसरा चौकामध्ये गेल्या वीस वर्षापासून खा.धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवारा मार्फत भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्याची परंपरा जोपासली जाते. या नयनरम्य सोहळ्या चा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून उस्फूर्तपणे लोकांची “तोबा गर्दी ” जमते.या दिमाखदार सोहळ्याचं सुनियोजन करत असताना उसळलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आलेल्या तसेच महाडिक कुटुंबीयांवरील प्रेमापोटी आलेल्या नागरिकांचे आदरातिथ्य करण्यासाठी खा.धनंजय महाडिक स्वतः जातीने फिल्डवर उतरतात. कार्यक्रम स्थळी प्रचंड घाई- गर्दी- गडबड असते व दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाची सुरक्षा व गर्दीच्या वेळचे नागरिकांच्या चेंगराचेंगरी पासून सुरक्षेचे उपाय ही एक मोठी जबाबदारी पण असते. या मुळे आयोजकांवर एक प्रकारचा मानसिक ताण आलेला असतो. याप्रसंगी भाषण करताना श्री.धनंजय महाडिक यांच्याकडून भारतीय जनता पक्षाने चिरंजीव श्री.कृष्णराज महाडिक यांना “भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी” असा उल्लेख करण्याऐवजी ओघात आणि घाई मध्ये चुकून
” प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी ”
संधी दिली असा अनावधानाने उल्लेख झाला. याला इंग्रजीमध्ये “स्लीप ऑफ टंग”असे म्हणतात. म्हणजे भाषण किंवा संभाषण करताना अजाणतेपणाने ओघात झालेली ही एक खूप सामान्य चुक असून या सामान्य घटनेचा सुद्धा पेपर मीडिया,सोशल मीडिया,टीव्ही मीडिया तसेच काँग्रेस पक्ष पातळीवर सुद्धा विपर्यास करण्यात येऊन एक राजकीय अप्रगल्भतेचे गलीच्छ प्रदर्शन घडविण्यात आले. खासदार महाडिकच काय पण इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडून अशी अनावधानाने झालेली चूक हा बोचऱ्या टिकेचा विषय होऊच शकत नाही.
या वस्तुस्थितीच्या
विपर्यासाला हिंदीमध्ये “बात का बत्तंगड बनाना” किंवा मराठीमध्ये “सुतावरून स्वर्ग गाठणे” किंवा “पराचा कावळा करणे” अशा समर्पक म्हणी आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व मीडिया यांच्याकडून या अतिसामान्य क्षुल्लक बाबी वरून महाडिक साहेबांच्या पक्षांतराविषयी पोरकटपणे तर्कवितर्क काढले गेले ही बाब लज्जास्पद तर आहेच पण निकोप निरोगी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून गंभीर असून राज्यातील राजकारणा बरोबर समाज माध्यमांचा ही दर्जा घसरत चालला आहे की काय याबाबत मला काळजी वाटते, संभाषणातील एका साध्या चुकीबद्दल नागरिक , मीडिया आणि पक्षीय पातळीवर एवढी चर्चा म्हणजे वैचारिक दिवाळखोरी चे लक्षण आहे असे खेदजनक उद्गार भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्राम दादा चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काढले. ते पुढे म्हणाले, सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी या एका साध्या संभाषणातील अनावधानाने झालेल्या चुकी बाबत केलेल्या उथळ कमेंट्स म्हणजे राजकारणातील रोगट मनोवृत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन असून आजच्या लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांच्या अपरिपक्व व्यक्तिमत्व विकास व अप्रगल्भ राजकीय जडणघडण आणि जबाबदारीची जाणीवेचा अभाव या बाबत सोलापूर जिल्हा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कोअर कमिटीचे सदस्य तथा शिवसेना नेते व जिल्हा प्रवक्ते प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. लोकशाहीमध्ये पक्ष सत्तेपर्यंत पोहोचण्याचे फक्त साधन असून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे हे सत्तेचे साध्य आहे. कार्यकर्ता हा सुजाण व सामाजिक भान असलेला घडायला हवा. प्रत्येक कार्यकर्ता हा लांगुल चालन
करणारा नाही तर सुशिक्षित ,स्वाभिमानी व बाणेदार घडायला हवा त्याच्याकडे “कॉमन सेन्स” असावा असे परखड मत सोलापूर जिल्हा शिवसेना नेता प्रा.संग्राम चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
