पांडुरंग कारखान्याकडून सभासदांसाठी २५ रुपये किलो दराने साखर!
३१ ऑगस्टपासून वाटप सुरू होणार!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूरकडून सभासदांसाठी प्रति किलो २५ रुपये दराने दर्जेदार साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कारखान्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही साखर वाटप योजना सोमवार, दि. ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पंढरपूर येथील वाखरी कार्यालयातून तसेच श्रीपूर येथील कारखाना कार्यस्थळावरील साखर विक्री केंद्रातून सभासदांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे.
कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, साखर वाटप फक्त सभासदांसाठीच करण्यात येणार असून, साखर घेण्यासाठी सभासदांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
दरम्यान, बाजारातील साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने आपल्या सभासदांसाठी केवळ २५ रुपये प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बाजारपेठेत साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सभासदांच्या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांना दर्जेदार साखर माफक दरात मिळावी, या उद्देशाने हे साखर वाटप सुरू करण्यात येत आहे.
