*कुरुल येथे उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी ऊस दरा संदर्भात इथेनॉल परिषदेचे आयोजन!*
*(रयत क्रांती पक्ष व संघटनेच्या वतीने, ऊस व इथेनॉल परिषदेचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजन)*
*(रयत क्रांती पक्ष व संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा प्रसन्न जाधव यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्ह्यातील रोजगार संदर्भात, ऊस व इथेनॉल परिषदेचे आयोजन सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रसन्न जाधव यांनी केले असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला कमीत कमी ५ हजार रुपये दर, इथेनॉल मिक्षित दर मिळावा व येणाऱ्या बैलपोळ्यासाठी तीनशे रुपये वाढीव ऊसबिल मिळावे; या व अशा अनेक मागण्यासाठी रयत क्रांती पक्ष व संघटनेच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आले असून या परिषदेला शेतकरी नेते सदाभाऊ खोत, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद शेठ पडळकर, प्रा, सुहास पाटील, दिपक दादा भोसले, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व रयत क्रांती संघटनेचे सर्वजण येथे पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, ही ऊस व इथेनॉल परिषद, कुरूल ग्रामपंचायतच्या समोर सायंकाळी सात वाजता आयोजित केली असल्याची माहिती, या परिषदेचे आयोजक असणारे रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रसन्न जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे!
