आषाढी वारी निमित्त कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंढरी २०२४ या कृषि महामहोत्स व प्रदर्शनाचे उद्घाटन मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न.
आषाढी वारीनिमित्त कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूरच्या आवारात भरविण्यांत आलेल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंडरी २०२४ या महामहोत्सव व कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे शुभहस्ते व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली फित कापून करण्यांत आले.
मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे शुभहस्ते उद्घाटन झालेनंतर त्यांनी प्रदर्शनातील स्टॉलवर भेट देवून माहिती घेतली व भव्य कृषि प्रदर्शनाचे कौतुक केले. स्टेजवरील फोटोपुजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली व बाजार समितीचे वतीने उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मा. आमदार श्री. प्रशांतरावजी परिचारक साहेब यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केले. यावेळी मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.
वारकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी याही पुढील काळात अनेक निर्णय घेतले जातील असे सांगितले. तसेच मा.आ. प्रशांतराव परिचारक यांच्या संकल्पनेतुन सुरू झालेल्या या कृषि प्रदर्शनातुन सर्वसामान्य जनतेस, शेतकरी यांना शेतीपुरक साहित्य, उपयोगी तंत्रज्ञान, अद्ययावत माहिती अवश्य घेता येईल व याचा लाभही सर्वांनी घ्यावा असेही सांगितले.
प्रदर्शनातील स्टॉल बाबत व सहभाग घेतलेल्या डाळींब शेतकरी यांचे विशेष कौतुक केले. शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा त्यांचे आरोग्य चांगले रहावे अशी पांडुरंगाकडे प्रार्थना करित शेतकऱ्यांसाठी पुर्ण सहकार्य करू, सरकार सदैव आपले सोबत आहे व कृषि प्रदर्शन आयोजीत केले बाबत बाजार समितीचे आभार मानले..
तसेच यावेळी बोलताना जिल्हयाचे मा. आमदार श्री. प्रशांतरावजी परिचारक यांनी बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये देण्याचा निर्णय तसेच इतर शेतकरी व वारकरी हिताचे निर्णय घेतल्यामुळे वारकरी व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.
या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषि पंढरी २०२४ या कृषि महामहोत्सव व प्रदर्शनासाठी बाजार समितीचे आवारात दि.१६/०७/२०२४ ते दि.१९/०७/२०२४ अखेर प्रदर्शन सुरू असुन या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० विविध स्टॉल आहेत. यामध्ये शासकीय विभागाच्या विविधी योजना माहिती, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना माहिती, शेतीविषयक तंत्रज्ञान, नवीन औजारे, औषधे अद्ययावत माहिती तसेच विविध उपकम यांची माहितीचा लाभ या स्टॉल मधुन हजारोंच्या संख्येने वारकरी, शेतकरी बंधु-भगिनी घेत आहेत.
याप्रसंगी बेदाण्याचा हार घालुन मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व सोलापूर जिल्हयाचे
पालकमंत्री मा.ना. चंद्रकांतदादा पाटील साहेब तसेच सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशिर्वाद साहेब यांचा बाजार समितीच्या वतीने सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड व उपसभापती मा.श्री. राजुबापु विठ्ठलराव गावडे यांचे शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यांत आला. यावेळी सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री. कुमार आशिर्वाद साहेब, कर्मयोगी सुधाकरपंत
परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री. दिनकरभाउ मोरे, व्हा. चेअरमन मा.श्री. कैलासराव खुळे (सर), अर्बन बँकेचे चेअरमन मा.श्री. सतिशराव मुळे, युवक नेते मा.श्री. प्रणवजी परिचारक, माजी नगराध्यक्ष मा.श्री. लक्ष्मणराव शिरसट, बाजार समितीचे माजी सभापती मा.श्री.दाजी पाटील, मा.श्री.विष्णु रेडे, मा.श्री. भगवानराव चौगुले उपसभापती मा.श्री. गंगाराम विभुते, मा.श्री. लक्ष्मणराव धनवडे, मा.श्री. संतोष घोडके, मा.श्री. विवेक कचरे, पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री. वामनराव माने (सर), उपसभापती मा.श्री. प्रशांत देशमुख, मा.श्री. अरूण घोलप, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. दिलीपराव गुरव, मा.श्री. तानाजी वापमोडे, मा.श्री. सुदाम मोरे, मा.श्री.बाळासाहेब यलमर, मा.श्री. नानासो गोसावी, मा.श्री. माउली हळणवर, मा.श्री. सुभाष मस्के सर, मा.श्री. हरीभाऊ गावंधरे, श्री. शुकाचार्य गवळी, श्री. रघुनाथ गाडेसे, श्री सितारामभाउ नागणे, श्री. रमेश गाजरे, श्री. इब्राहिम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक मा.श्री. दिलीप प्रिंयक चव्हाण, मा.श्री.तानाजी चंद्रकांत पवार, मा.श्री. हरिभाऊ मच्छिंद्र फुगारे, मा. श्री. महादेव पंढरीनाथ बागल, मा.श्री. संतोष पंढरीनाथ भिंगारे, मा.सौ. शारदा अरूण नागटिळक, मा. सौ. संजिवनी बंडू पवार, मा.श्री. महादेव सुखदेव लवटे, मा. श्री. नागनाथ भिमराव मोहिते, मा.श्री. अभिजीत दिनकर कवडे, मा.श्री. पंडीत मारूती शेंबडे, मा.श्री. वसंत महादेव चंदनशिवे, मा.श्री. शिवदास वामन ताड, मा.श्री. सोमनाथ सदाशिव डोंबे, मा.श्री. यासीन अजीज बागवान, मा.श्री. आबाजी औदुंबर शिंदे, सचिव श्री. कुमार घोडके, सहा. सचिव श्री. संजय माने आदी सह. वारकरी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.