राज ठाकरे यांच्या सभेने दिलीप धोत्रे यांचे पारडे जड
मतदारसंघातील नागरिकांनी केला दिलीप बापू धोत्रे यांना विजयी करण्याचा निर्धार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे झालेल्या सभेमुळे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचे पारडे जड झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मंगळवेढा येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना निवडून द्या.
मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल. येथील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे तसेच बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग निर्मिती करून नोकरी मिळवून देऊ असे अभिवचन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील नागरिकांना दिले आहे.
यावेळी त्यांनी मी आमच्या दिलीप बापू साठी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे असे आवर्जून सांगितले होते.
या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी हजारो नागरिक भर उन्हात राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जमा झाले होते.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कामे केली आहेत.
आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप बापू धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले आहे. पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिक मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.
त्यामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.