
भाजपाचे प्रांतिक सदस्य संतोष अण्णा पाटील यांनी उचलला मदतीचा मोठा हातभार!
नागेश क्षीरसागर यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केले होते सर्वांना आवाहन!
आडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्याच्या पाठिशी उभा राहणे हे आमचे कर्तव्य:संतोषआण्णा पाटील
(सुनील दादा चव्हाण यांच्या आवाहनानंतर क्षीरसागर यांना जवळजवळ २५ हजार रुपयांची केली सर्वांनी महत्त्वपूर्ण मदत)
मोहोळ शहरातील माजी जि. प.सदस्य व भाजपा अनु. जाती मोर्चाचे माजी उपाध्यक्ष श्री. नागेश (मेजर) क्षीरसागर यांची सध्या व्यावसायिक आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज होती, त्या अनुषंगाने काल मोहोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये सदर विषय भाजपचे तालुकाध्यक्ष श्री.सुनील (दादा) चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यासमोर मांडला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या मोहोळ तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय ही घेतला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य मा.संतोष (आण्णा) पाटील यांनी त्यांना मदत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, त्याचसोबत त्यांनी भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्याला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे या उद्देशानी त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढले पाहिजे, हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी वैयक्तिक २५ हजार रुपयाची मदत देऊ केली व उर्वरित २५हजार रुपये कार्यकर्त्यांमध्ये मधून जमा करून त्यांना एकूण ५१हजार रुपयाची मदत यावेळी करण्यात आली. सामाजिक कार्य करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तो पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सामाजिक कार्यकर्ता अडचणीच्या त्यांच्या पाठीशी उभा राहणे हे आमचे कर्तव्य आहे असे भाजपा नेते संतोष आण्णा पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपा प्रदेश प्रांतिक सदस्य श्री. संतोष आण्णा पाटील, भाजपा नेते श्री. शंकरराव नाना वाघमारे, तालुकाध्यक्ष श्री सुनील दादा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष श्री सुशील भैय्या क्षीरसागर,श्री महेश सोवनी , श्री अविनाश पांढरे, श्री मूजीब भाई मुजावर, श्री अंकुश अवताडे, श्री गणेश झाडे, श्री बाळासाहेब पाटील , श्री दीपक पुजारी , श्री विशाल पवार, श्री गुरुराज तागडे, श्री गणेश मुळे, श्रीदगडू डोंगरे, श्री आनंद पाटील, श्री बालाजी गवळी, श्री प्रदीप आमले, श्री बंडू ढेरे , श्री महादेव माने, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी श्री नागेश मेजर क्षीरसागर यांनी सर्वांचे अंत.करणपूर्वक आभार मानले.