
करकंब ते नांदोरे रस्त्याचे काम रखडले!
(आ.अभिजित पाटील यांनी यासाठी उठविला अधिवेशनात आवाज)
करकंब ते नांदोरे रस्त्याचा कामाचा शुभारंभ होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे परंतु ठेकेदारांकडून अद्याप काम पूर्णत्वास आले तर नाही परंतु काम अर्धवट सोडले आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून काम सुरू करण्याच्या सूचना केल्या जात असल्या तरी निघरघट्ट ठेकेदार अधिकाऱ्यांच्या सूचनेला न जुमानता काम सुरू करीत नसल्याने संबंधित विभागाकडून ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे परंतु वरिष्ठ स्तरावर काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
करकंब नांदोरे रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 11 किमी साठी 13 कोटी 42 लाख 84 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे असे असताना केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याचे नाव पुढे करून ठेकेदारांकडून कामात हायगय केली जात आहे रस्त्यावर पसरलेली अस्तव्यस्त खडीमुळे अपघात होऊ लागले आहेत त्यातच रस्त्यावर पाणी मारण्यासाठी होत असलेल्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून काम वेळेत करणार नसाल तर रस्त्यावर उतरण्याची भूमिका येथील नागरीक मांडू लागले आहेत
ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव
मागील एक वर्षांपूर्वी उदघाटन झालेल्या करकंब ते नांदोरे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना वारंवार सूचना केल्या जात आहे परंतु ठेकेदारांची काम करण्याची मानसिकता नाही यामुळे संबंधित विभागाकडून दंडाचा प्रस्ताव केला तरीही निघरघट्ट ठेकेदार काही केल्या काम सुरू करीत नसल्याने संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविला असल्याचे उपकार्यकारी अभियंता नागेश जाधव यांनी सांगितले
आ. अभिजीत आबा पाटील यांनी अधिवेशनात मांडला रस्त्याचा प्रश्नकरकंब-नांदोरे रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे त्याचे उदघाटन होऊन कामाचा शुभारंभ केला परंतु संबंधित ठेकेदारांनी काम अर्धवट ठेवले आहे ते काम सुरू करण्यासंबंधी आमदार अभिजित पाटील यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात प्रश्न मांडला आहे त्याला शासनाकडून किती प्रतिसाद मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे